▪️ हत्ती तिलारीच्या दिशेने परतले
दोडामार्ग – प्रतिनिधी
रानटी हत्तीकडून अलीकडे काही दिवस नुकसान सत्र बंद होते. मात्र, काल रात्री विनायक मणेरीकर यांच्या केळी बागायतीचे नुकसान केले आहे. यापूर्वीही श्री. मणेरीकर यांचे नुकसान करण्यात आले होते. उत्पन्न योग्य बागायत होत असताना होत असलेली नुकसान पाहून शेतकरी मात्र व्यथित झाले आहेत. वनविभागाने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांतुन होत आहे. शिवाय हत्ती तळकट ते तिलारी प्रवास करत आपला आवाका वाढवत असल्याने भीती वाढ़ली आहे.









