सावंतवाडी / प्रतिनिधी
Vinay Wadkar’s success in (NET) National Eligibility Test Exam!
गोगटे वाळके कॉलेज बांदाच्या एम ए मराठी विभागाचा माजी विद्यार्थी विनय रविउदय वाडकर याने विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्यावतीने डिसेंबर 2022 साली घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत ( NET) ९४% गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी जी काजरेकर, प्रा. हर्षवर्धिनी जाधव, प्रा. एन डी कार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. बी. वारंग, सचिव एस. आर. सावंत, प्राचार्य काजरेकर यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.









