आंदोलनामुळे शेतकऱ्यांसह कारखानदारांचे नुकसान; दराबाबत लवकरच निघेल तोडगा
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील गाळप हंगामाचे चित्र पाहता केवळ कोल्हापूर जिह्यातील साखर कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत. शेजारी सांगली आणि कर्नाटक राज्यातील कारखाने सुरू झाल्यामुळे तिकडे ऊस जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेटी यांच्या आंदोलनामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील या दोंघांची त्यांच्याशी चर्चा सुरू असून लवकरच त्याला यश येईल आणि तोडगा निघेल असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, राजू शेटी हे गत हंगामातील 400 द्या म्हणत आहेत. त्यावरच ते अडून आहेत. कारखानदारांना ते देणे शक्य नाही. मी एक कारखानदार नाही तर जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून बोलतो आहे. सध्या कारखान्याच्या किमती एवढे कर्ज झाले आहे. राज्यात कुठेही एक रकमी एफआरपी नाही. मात्र कोल्हापूर जिह्यातील कारखान्यांकडून कर्ज काढून एकरकमी एफआरपी दिली जाते. यामध्ये एक रक्कमीमधील प्रतिटन 1100 रूपये हे कर्जावर घ्यावे लागतात. त्याची देणी वाढतच आहेत. उद्या यापेक्षाही भयानक परिस्थीती निर्माण होईल. अन्य जिह्यात तीन टप्यात एफआरपी दिली जाते. त्यामुळे त्यांच्यावर नाहक व्याजाचा भूर्दंड पडत नाही. त्याचबरोबर साखरेला जादा भाव मिळतो. मात्र जिह्यातील साखर कारखान्यांना कमी दर असतानाही भितीपोटी साखर विकावी लागते
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, माझ्या कारखान्याची साखर विका म्हणून राजू शेट्टी यांना विनंती केली आहे. मागील दहा वर्षाचा साखरेचा हिशोब दिला आहे. आता साखरेला दर कमी आहे. जेंव्हा साखर उत्पादन होते तेंव्हा दर पडलेले असतात. राजू शेट्टीसारखे नेते शेतककऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्यामुळेच साखर कारखानदार वटणीवर आले आहेत. त्यांच्या आंदोलनाबाबत आपल्याला काही म्हणायचे नाही. ते हट्टवादी भूमिका घेत आहेत असाही दावा नाही. मात्र त्यांनी चर्चा करून तोडगा काढावा. सध्याची परिस्थीती पाहवी. अन्यथा जिह्यातील दोन कारखाने आता बंदच होणार असून इतरही त्याच वाटेवर आहेत.
गाय दूध खरेदी बंद करणार नाही
शिवसेनेचे संजय पवार विजय देवणे यांच्या गोकुळवरील आंदोलनाबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, यापुर्वी अनेक वेळा गायीचे दुध गोकुळने स्वीकारले नाही. मात्र आम्ही अशी भूमिका घेतलेली नाही. प्रसंगी तोटा सहन करून दुध स्वीकारत आहोत. पवार यांच्या आंदोलनाबाबत काही मत नाही. त्यांना चर्चेला बोलावणार आहे. वस्तुस्थिती निदर्शनास आणून देणार आहे. त्यानंतर त्यांनाही पटेल. कारखान्यांचा तोटा असाच होत गेला तर भविष्यात काय होईल हे लक्षात घ्यावे.