Vinay Kore On Sambhajiraje Chhatrapati : छत्रपती संभाजीराजे हे माझे मित्र आहेत. मात्र, विशाळगडाबाबत त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट गैरसमजातून केली आहे.इतक्या मोठ्या जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीने फेसबुक पोस्ट करणे योग्य वाटत नाही, असं वक्तव्य आमदार विनय कोरे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट करत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये अन्यथा शिवप्रेमी जनता धडा शिकवेल असा इशारा दिला होता याला आमदार विनय कोरे यांनी उत्तर दिलं आहे.
यावेळी बोलताना ते म्ङणाले की, विशाळगडाच्या अतिक्रमणाला चालना देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं नव्हतं तर समन्वय साधण्यासाठी ही बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने ही बैठक रद्द केली होती. यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता,पण अशा पद्धतीने पोस्ट करणे आणि याबाबत चर्चा करणे कसं काय घडलं हे मला कळत नसल्याचेही ते म्हणाले.
संभाजीराजेंची पोस्ट
विशाळगड अतिक्रमणाबाबत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये अन्यथा शिवप्रेमी जनता धडा शिकवेल.
दीड महिन्यापूर्वी समस्त शिवभक्त व दुर्गप्रेमी मंडळींच्या सोबत किल्ले विशाळगडची पाहणी करून आम्ही जिल्हा प्रशासनासोबत विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत विशाळगडाचे अतिक्रमित रहिवासी, दुर्गप्रेमी संस्था,संबंधित प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण होते.मात्र लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरविली. या बैठकीत ही सर्व अतिक्रमणे हटविण्याचा एकमुखी निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत ?
आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये.आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठीशी घातल्यानेच विशाळगडाची ही विषन्न अवस्था झालेली आहे.अजूनही गडावर चालू असलेल्या करवाईवर दबाव आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र आता शिवभक्त जागा झाला आहे,तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही.आमदारांच्या या गुपचूप बैठकीचा राजकीय डाव उधळणाऱ्या दुर्गप्रेमी शिवभक्तांचे अभिनंदन. प्रशासनाने आश्वासन दिल्यानुसार महाशिवरात्रीच्या आधी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविलीच पाहिजेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








