ऑनलाईन टीम/ तरुण भारत
कोल्हापूर: राज्यात राज्यसभेवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात उद्या मतदान होणार असून सत्ताधारी आणि विरोधक यांनी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद लावली आहे. दोन्ही पक्ष आपले उमेदवार निवडून येतील या मतावर ठाम आहेत. दरम्यान कोल्हापुरात (Kolhapur) भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhanajya Mahadik) यांना निवडून आणण्यासाठी भाजप (BJP) आपल्या अस्त्रांचा वापर करत आहे. तर या निवडणूकीत घोडेबाजार होणार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून बोलले जात आहे. त्यातच आता विनय कोरे यांनी मविआवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रात 2 दिवसांत मान्सून धडकण्याची शक्यता; IMD विभागाची माहिती
विनय कोरे म्हणाले, राज्याच्या राजकारणात मी नेहमी भाजपसोबत असेल वारंवार भूमिका बदलणारी आम्ही मंडळी नाही. माझा एकदा निर्णय झाला की त्यावर आम्ही ठाम असतो त्यामुळे महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi)मला संपर्क करण्याचे धाडस नाही असा उपरोधक टोला (Vinay Kore)विनय कोरे यांनी मविआला लगावला. आज माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
हेही वाचा- इथेनॉल मिश्रित पेट्रोल : जाणून घ्या फायदे- तोटे
दरम्यान राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आज संध्याकाळी भाजपाने बैठक बोलवली आहे. त्यामुळे भाजप खेळी खेळणार असल्याचे बोलले जात आहे. सहाव्या जागेसाठी तिसरा उमेदवार उभा करुन आधीच भाजपने मविआची कोंडी केली आहे. आजच्या बैठकित नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आज नवाब मलिक, अनिल देशमुखांचा राज्यसभेसाठी मतदानाचा अर्ज फेटाळल्याने आघाडीला मोठा दणका बसला आहे.