वृत्तसंस्था / माद्रीद
ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात व्हिलारेलने गेटाफीला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत व्हिलारेलने गेल्या 5 सामन्यात आपली अपराजित मालिका कायम राखली आहे. त्यांनी गेल्या 5 पैकी 4 सामने बरोबरीत सोडविले आहेत. शुक्रवारच्या सामन्यात 24 व्या मिनिटाला गेटाफीचे खाते ग्रीनवूडने उघडले. मध्यंतरापर्यंत गेटाफीने 1-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर मॉरेनोने व्हिलारेलला बरोबरी साधून देताना शानदार गोल केला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात गेटाफी 10 व्या स्थानावर असून व्हिलारेल 13 व्या स्थानावर आहे.









