वार्ताहर कुडाळ
तेंडोली रवळनाथ मंदिर समोरील उज्वला नदीवरील पुल हे पावसातील पुराच्या पाण्याने वाहतुकीस धोकादायक झाले होते. या पुलावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शुक्रवारी या पुलावरील खड्डे ग्रामस्थांच्या सहकार्याने सिमेंट कॉक्रीट घालून बुजविण्यात आले.
यावेळी सरपंच अनघा तेंडोलकर, उपसरपंच संदेश प्रभू, माजी सरपंच भाऊ पोतकर, सोसायटी चेअरमन विजय प्रभू, ग्रा. प. सदस्य आकाश मुनणकर, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र राऊळ, प्रकाश राऊळ, आनंद नाईक, नाना परब, सुनील चव्हाण, सुनील मुनणकर,राकेश कुंभार यांच्या आर्थिक सहकार्यातून हे काम करण्यात आले. यावेळी सुनील तेंडोलकर, अरुण राऊळ, नवसू तेंडोलकर, संतोष तेंडोलकर, रवी तेंडोलकर, उत्तम तेंडोलकर, सिद्धेश तेंडोलकर, सदानंद राऊळ आदी ग्रामस्थांनी श्रमदान केले.









