पुलाची शिरोली / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व्ही.बी. भोगण यांच्याकडून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली. तसेच भोगण यांनी गावचे कोतवाल संदीप धोंडीराम पुजारी यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना बघून घेण्याची धमकीही दिली. तत्पूर्वी कोतवाल पुजारी यांनी नायब तहसीलदार शोभा कोळी व मंडल अधिकारी अनिता खाडे यांना घडला प्रकार सांगितला आहे.
याबाबत कोतवाल पुजारी यांनी सांगितलेली माहिती अशी की, हातकणंगले तहसील कार्यालयातून ग्रामसेवक व्ही. बी. भोगण यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नेमणुकीचा आदेश काढला होता. तो आदेश घेऊन कोतवाल संदीप पुजारी मंगळवारी शिरोली ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. भोगण यांनी सदरचा आदेश स्विकारण्यास मनाई केली. सदरचे काम निवडणूक विभागाचे असल्याने आपण हा आदेश घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला.
तसेच ग्रामसेवक भोगण यांनी कोतवाल पुजारी यांना “तुझी लायकी आहे काय…तू कोतवाल आहेस माझा बॉस नाहीस. मला तू ऑर्डर लागू करणारा कोण..तुला बघून घेतो” अशी धमकी दिली. तसेच नोटीस घेत नाही काय करायचे आहे ते कर असे बोलुन ते ग्रामपंचायतीमध्ये कोलवाल पुजारी यांना अपमानास्पद वागणूक दिली.









