आधी शहराचा विकास करा, मग हाद्दवाढ करा…कोल्हापूरच्या माजी नगरसेवकाचा व्हिडिओ व्हायरल..
गोकुळ शिरगाव वार्ताहर
कोल्हापूर शहराची हद्दवाढ विरोधात 18 गावात कडकडीत बंद ठेवण्याचे डिजिटल बोर्ड झळकत आहेत .हद्दवाडी विरोधात 18 गावात कडकडीत बंद पाळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने प्रत्येक गावात मोठमोठे डिजिटल बोर्ड लावुन गाव बंद ठेवण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले आहे .याला सर्व ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे .
दरम्यान, काल नुकतेच एका कोल्हापूर शहराच्या माजी नगरसेवकांनी हद्दवाडी संदर्भात शहराची दुरावस्था कशी झाली आहे. यात त्यांनी शहराच्या दुरावस्थेची व्यथा मांडली आहे. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे . हा व्हिडिओ या 18 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आधी शहराचा विकास करा मगच आमच्या हद्द वाढीकडे वळा असा सूर या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत आहे.









