ओटवणे / प्रतिनिधी
आबा दळवी यांनी जबाबदारी घेतलेल्या जागेवर काँग्रेस विजयी
विलवडे गावचे सुपुत्र असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्यावर जबाबदारी दिलेल्या कर्नाटकातील गदग मतदार संघातील काँगेसचे उमेदवार एक के पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा सुमारे १५ हजार मतांनी पराभव केला. या मतदार संघात आबा दळवी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह पंधरा दिवस तळ ठोकून होते. या चुरशीच्या लढाईत या मतदार संघात काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेत आबा दळवी यांनी महत्त्वाची भुमिका बजावली.
काँगेसचे उमेदवार एस के पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसने दिलेली जबाबदारी आबा दळवी यांनी चोखपणे पार पाडली. काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिल्यामुळे त्यांनी आपल्या विलवडे गावातील ग्रामदैवत माऊलीचा चार दिवस उत्सव सुरु असतानाही प्रचार समाप्त झाल्यानंतर शेवटच्या दोन दिवसांत ते आपल्या गावी पोहोचले.निवडणूक निकालात सकाळी एस के पाटील यांनी आघाडी घेतल्यानंतर गावच्या उत्सवासाठी आलेले आबा दळवी तात्काळ कर्नाटकात दाखल झाले. त्यानंतर दुपारी त्यांनी काँग्रेसच्या विजयोत्सवात सहभाग घेतला. यावेळी आबा दळवी यांनी एस के पाटील यांचे अभिनंदन केल्यानंतर त्यांनीही आबा दळवी यांचे आभार मानले.









