Vilawade Sarpanch Prakash Dalvi felicitated by Congress District President Irshad Shaikh
विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांचा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .विलवडे सरपंच दळवी भाजपचे असल्याचा दावा भाजपने केला होता. दळवी हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे ते काँग्रेसचे आहेत असे इरशाद शेख यांनी सांगितल .दळवी यांचा शेख यांनी बुधवारी सत्कार केला .यावेळी माजी पंचायत समिती माजी उपसभापती कृष्णा सावंत ,काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष तथा ओटवणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, चंद्रकांत राणे,संदिप सुकी,सुधीर मल्हार, काँग्रेस ओबीसी सेल तालुकाध्यक्ष अभय मालवणकर,सगुण गावकर इत्यादी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी









