ओटवणे/प्रतिनिधी: विलवडे येथील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने राजा शिवाजी विद्यालय येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मंगळवारी ६ जुन रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा छत्रपती कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनायक दळवी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.
यानिमित्त मंगळवारी सकाळी ६ वाजता फुकेरी येथील शिवकालीन हनुमंत गडावरून शिवज्योत कार्यक्रम स्थळी निघणार आहे. तसेच विलवडे, भालावल आणि सरमळे ग्रामपंचायत येथून युवक ग्रामस्थ व महिलांचे रॅलीने कार्यक्रम स्थळी आगमन होणार आहे. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर शिवज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपतींच्या पुतळ्याची पूजा केल्यानंतर ध्वजाचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर या स्थळाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.
तसेच यावेळी शिवाजी महाराजांवर व्याख्यान व पोवाडे आदी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विलवडे शिवप्रेमी मित्रमंडळाने केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









