प्रतिनिधी /बेळगाव
सातव्या वर्धापन दिनानिमित्त काकडे फौंडेशनतर्फे तरुण भारतच्या खजाना पुरवणीमध्ये ‘स्मरण स्वातंत्र्य वीरांचे’ या सदरातून अनेक स्वातंत्र्य वीरांची ओळख करून देणाऱया विलास खटावकर यांचा सत्कार करण्यात आला.
ठळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. आर. कुडतूरकर व काकडे परिवाराचे नितीन काकडे यांच्या हस्ते शाल, फळकरंडी, भेटवस्तू, पुष्प, सन्मानपत्र देण्यात आले. बुधवार दि. 15 रोजी ठळकवाडी हायस्कूलमध्ये सर्व स्टाफसह हा छोटेखानी समारंभ आयोजित केला होता.
नव्या पिढीला स्वातंत्र्याची लढाई कशी लढली गेली हे जाणून घेण्यासाठी असे लेखन महत्त्वाचे असल्याचे किशोर काकडे म्हणाले. शिक्षक सी. वाय. पाटील यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.









