सावंतवाडी मतदारसंघ काँग्रेसलाच मिळावा ; काँग्रेसच्या विलास गावडेंची मागणी
सावंतवाडी | प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आम्हाला विश्वासात घेत नाही. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघाची जागा काँग्रेसलाच सोडा अशी भूमिका काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी घेतली आहे . सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजन तेली यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश करण्याच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये आता हा मतदार संघ आपल्याच पक्षाला मिळावा असा दावा सुरू झाला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आधी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने पत्रकार परिषदेचे आयोजनही केले आहे.









