वृत्तसंस्था /नवी दिल्ली
78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची थीम ‘विकसित भारत’ अशी आहे. 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्रात रुपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेनुसार ही थीम निश्चित करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए. भारतभूषण बाबू यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये यासंबंधी माहिती दिली. थीम जाहीर करतानाच त्यांनी लाल किल्ला आणि विकास भारतची घोषणा दर्शविणारे एक पोस्टरही शेअर केले आहे. भारत 2047 मध्ये स्वातंत्र्याची 100 वे पूर्ण करणार असल्याने गेल्या तीन वर्षांपासूनच काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहे. या उद्दिष्टांमध्ये परिस्थितीनुरुप वेळोवेळी सुधारणा केली जात आहे.









