विंडीजविरुद्ध पहिला कसोटी सामना भारताने 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज अश्विनने 12 बळी घेत विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात विकेट्सचे 7 बळी घेत खास विक्रम आपल्या नावावर केले. एका विक्रमात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा भारतीय ठरला.
- दुसऱ्या डावातील 7 विकेट्ससह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनच्या 709 विकेट्स पूर्ण झाल्या. यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. या यादीत अव्वलस्थानी फिरकीपटू अनिल कुंबळे यांचा समावेश आहे. त्यांच्या नावावर 953 विकेट्सची नोंद आहे. तसेच, या यादीत तिसऱ्या स्थानी हरभजन सिंग असून त्याने कारकीर्दीत 707 विकेट्स घेतल्या आहेत.
- अश्विनने तब्बल 34 वेळा एका कसोटी डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. परदेशात खेळताना हे अश्विनचे कोणत्याही कसोटी डावातील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले. या सामन्याच्या पहिल्या डावातही अश्विनने पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्याने सामन्यात 131 धावा खर्चून 12 विकेट्स घेतल्या. परदेशात कोणत्याही कसोटीत हे अश्विनचे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. यासोबतच हे एखाद्या भारतीय गोलंदाजाचे परदेशातील तिसरे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले.
- अश्विनने 8 वेळा कोणत्याही कसोटीत 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळेने अशी कामगिरी केली होती. आता दोघेही 8 वेळा अशी कामगिरी करत बरोबरीवर आहेत. अश्विनकडे आता कुंबळेच्याही पुढे जाण्याची संधी आहे.
- अश्विनने टाकले मुरलीधरनला मागे
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 12 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने 6 व्यांदा अशी कामगिरी केली आहे. याचवेळी, श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरननेही आपल्या कारकिर्दीत 6 वेळा 12 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. पण मुरलीधरनने 133 कसोटी सामन्यांमध्ये हा आकडा गाठला होता आणि अश्विनला हा आकडा गाठण्यासाठी केवळ 93 कसोटी सामने खेळावे लागले.
- कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स
11 – मुथय्या मुरलीधरन
8 – रंगना हेराथ
6 – सिडनी बार्न्स
6 – आर अश्विन
- भारत वि. वेस्ट इंडिज कसोटीत सर्वाधिक विकेट्स
89 -कपिल देव
76 -माल्कम मार्शल
74 -अनिल कुंबले
72 -आर अश्विन.









