वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिडे क्लासिकल बुद्धीबळ स्पर्धेला इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने पहिल्या फेरीतील विजयाने प्रारंभ केला आहे. पहिल्या फेरीतील झालेल्या डावात विक्रमादित्यने रियांश कदमचा पराभव करत पूर्ण गुण मिळवला. पहिल्या फेरीतील विविध पटावर झालेल्या सामन्यांमध्ये ओम गडाने अद्वैय हेमंत अहिरेचा पराभव केला. मयुरेश पारकरने विहान शहावर तर पासबोला समविदने अखिल शहावर मात करीत पूर्ण एक गुण वसूल केला. प्रशांत चौगुलेने आदित्य चक्रवर्तीचा पराभव केला. अपूर्व देशमुखने ओमयश आनंदवर तर पारकर मयुरेशने विहान शहावर मात करत एक गुण मिळविला.









