नवी दिल्ली :
हवाई क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंडिगो एअरलाइनच्या चेअरमनपदी विक्रम सिंग मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते वेंकटरमणी सुमंत्रण यांची जागा घेतील.
मेहता यांच्या निवडीला संचालक मंडळाचा हिरवा कंदील मिळाला. सुमंत्रण यांनी 5 वर्षांच्या सेवेनंतर पदाचा राजीनामा दिला आहे. मे 2022 मध्ये त्यांना संचालक मंडळाने चेअरमन म्हणून नियुक्त केले होते. तीन वर्षात कंपनीला विकासाच्या पथावर आणण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले. तर नव्याने नियुक्त झालेले विक्रम सिंग मेहता हे माजी आयएएस अधिकारी आहेत. शेल ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन आणि शेल मार्केटस व शेल केमिकल्स, इजिप्तचे ते सीईओ राहिले आहेत. विविध कंपन्यांच्या संचालक मंडळातही त्यांनी कार्य भुषवले आहे.









