प्रतिनिधी/ बेळगाव
केरळच्या तिरुवअनंतपूरम येथे आयोजित केलेल्या ‘सरोद’ या दहाव्या परिसंवादाच्या निमित्ताने बेळगावच्या सर्वोकंट्रोल्स ग्रुपला सन्मानित करण्यात आले. तेथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या डॉ. कलाम सभागृहामध्ये 12 डिसेंबर रोजी झालेल्या अंतराळयानाच्या प्रक्षेपणासाठी सर्वोकंट्रोल्सने 1.2 मीटर ट्रायसोनिक विंड टनेलच्या यशस्वी पूर्ततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सर्वोकंट्रोल्सचे विजय प्रभू (डीजीएम प्रकल्प व मार्केटिंग) व राहुल कुलकर्णी (मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह), दीपक रेड्डी (असिस्टंट मॅनेजर मार्केटिंग) यांनी हा सत्कार स्वीकारला. सर्वोकंट्रोल्स ग्रुपचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दीपक धडोती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोकंट्रोल्स कार्यरत आहे.









