एकमेव कसोटीसाठी नियुक्ती
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांची अफगाणविरुद्ध येथे होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी न्यूझीलंड संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 9 ते 13 सप्टेंबर या कालावधीत ही कसोटी होणार आहे. तसेच लंकेचे माजी स्पिनर रंगना हेराथ यांची किवी संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
राठोड यांनी कारकिर्दीत भारतातर्फे सहा कसोटी खेळल्या. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक असताना त्यांच्या साहायक स्टाफमध्ये राठोड यांचा समावेश होता. अफगाणविरुद्ध होणाऱ्या कसोटीसाठी ते न्यूझीलंड संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय लंकेचे माजी स्पिनर रंगना हेराथ यांना न्यूझीलंडने गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. पाकचे माजी गोलंदाज सकलेन मुश्ताक यांच्या जागी त्यांना स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंड संघाचे गुरुवारी येथे आगमन झाले असून त्यांना सरावाला सुरुवातही केली आहे.









