वृत्तसंस्था / जयपूर
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्स संघाने भारताचा माजी सलामीचा फलंदाज विक्रम राठोड याची फलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
2025 च्या आयपीएल मौसमासाठी राजस्थान रॉयल्सने यापूर्वीच भारताचे माजी प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रवीडची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आता प्रशिक्षक वर्गामध्ये विक्रम राठोडचा समावेश त्यांनी केला आहे. राठोडने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 6 कसोटी आणि 7 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले असून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 33 शतके झळकविली आहेत.









