गुडघ्यापर्यंत वाढले केस
6 वर्षीय मुलीने सर्वात लांब केस बाळगण्याचा ‘किड्स वर्ल्ड रेकॉर्ड’ स्वतःच्या नावावर केला आहे. या मुलीच्या केसांची लांबी 1.2 मीटर आहे. तर या मुलीचे नाव जास्मिन बॅन्स आहे. जास्मिन ही ब्रिटनच्या डर्बीशायरमधील लिटिलओव्हर येथे राहते. जास्मिनने कधीच स्वतःचे केस कापलेले नाही, तिचे केस गुडघ्यांपेक्षाही खाली पोहोचले आहेत. जास्मिनने जून महिन्यात सर्वात लांब केस असण्याचा ‘किड्स वर्ल्ड रेकॉर्ड’ स्वतःच्या नावावर केला आहे.
जास्मिनची आई टीना यांना स्वतःच्या मुलीच्या यशाबद्दल मोठा अभिमान आहे. आम्ही नेहमीच तिच्या लांब केसांबद्दल बोलायचो. एकेरात्री झोपायला जाण्यापूर्वी जास्मिनला सर्वाधिक लांब केस असणाऱया व्यक्तीबद्दल बोलले होते. त्यानंतर आम्ह ाr गुगलवर सर्च केल्यावर अशी कामगिरी करणाऱया व्यक्तीची माहिती आम्हाला मिळाल्याचे टीना यांनी सांगितले.
याचदरम्यान एखाद्या मुलीच्या सर्वात लांब केसांबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड आहे का असा विचार मनात आला. त्यानंतर पुन्हा इंटरनेटवर सर्च केल्यावर किड्स वर्ल्ड रेकॉर्ड या वेबसाइटची माहिती मिळाली. तेथे मुलांच्या नावावरील वर्ल्ड रेकॉर्ड्सची माहिती होती. यात 4 ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांचे सर्वात लांब केस असल्याचे विक्रम नोंद होते असे टीना यांनी सांगितले आहे.
यातील विक्रमधारक मुलगी कॅनडाची रहिवासी होती. परंतु आमच्या मुलीचे केस तिच्याहून अधिक लांब होते. जास्मिनच्या केसांची लांबी मोजल्यावर वेबसाइटवर लॉगइन केले आणि जास्मिनचा व्हिडिओ त्यावर अपलोड केला होता. ही प्रक्रिया यशस्वी ठरली आणि जास्मिनच्या नावावर सर्वात लांब केस असण्याचा विक्रम नोंदविला गेला असे टीना यांनी म्हटले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधिताचे केस कोरडे असणे आवश्यक आहे.