
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक मार्केट व बेळगाव जिल्हा शरीरसौ÷व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 18 व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौ÷व स्पर्धेत अविघ्न जीमच्या विकास शहापूरकरने श्री गणेश हा मानाचा किताब पटकाविला तर मोरया जिमच्या रोहित भट्टने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला.
रामनाथ मंगल कार्यालयात आयोजित 18 व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौ÷व स्पर्धेत 150 हून अधिक शरीरसौ÷वपटूंनी भाग घेतला होता. सदर स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार 55 ते 80 किलोवरील वजनी गटात घेण्यात आली.
निकाल ः 55 किलो गट 1) रितिक लाखे -युनिक निपाणी, 2) आकाश निगराणी पॉलीहैड्रॉन, 3) जोतिबा बिर्जे-भवानी, 4) रोहित सप्ले-समर्थ, 5) रोहन अल्लूर-कार्पोरेशन. 60 किलो गट-1) उमेश गंगणे-एस. एस. फौंडेशन, 2) मंजुनाथ सोनटक्की – अविघ्न, 3) आकाश साळुंखे -रॉयल, 4) गणेशा पाटील- मोरया, 5) दिनेश नाईक-शिवनेरी. 65 किलो गट-1) विकास शहापूरकर- अविघ्न, 2) भाऊ लोहार-भैरू, 3) उमेश सांबरेकर-मेणसे फिटनसे, 4) शैलेश मजुकर-ऑलिंपिया, 5) भरत पाटील-बीस्ट्राँग. 70 किलो गट-1) प्रताप कालकुंद्रीकर-एस एस. फौंडेशन, 2) सुनिल भातकांडे-एक्स्ट्रीम, 3) संदीप पावले -मॉडर्न, 4) शिवकुमार पाटील-बीस्ट्रॉंग, 5) नागेश संताजी-आरोग्य. 75 किलो गट-1) वेंकटेश ताशिलदार-फिटनेस 2) ओंकार गोडसे-एवन गोल्डन, 3) ओंकार कडेमनी-आरोग्य, 4) मैफुस मुल्ला-मोनू, 5) यल्लाप्पा गावडे- एसआरएस. 80 किलो गट-1) नितीन पाटील -फिटनेस, 2) गजानन काकतीकर-एसएस फौंडेशन, 3) सुधीर मन्नोळकर-शिवशक्ती, 4) बसवाणी गुरव-अभिनव, 5) सागर पाटील- सुर्या. 80 किलोवरील गट-1) महेश गवळी -रूद्र, 2) सनी मयेकर-फिटनेस, 3) आकाश नेसरीकर-फिट फोर्ज, 4) प्रतिक बाळेकुंद्री, 5) शुभम कोचेरी-एक्स्ट्रीम.
त्यानंतर झालेल्या श्री गणेश किताबासाठी रितीक लाखे, उमेश गंगणे, विकास शहापूरकर, प्रताप कालकुंद्रीकर, वेंकटेश ताशिलदार, नितीन पाटील व महेश गवळी यांच्यात लढत झाली. त्यानंतर विकास शहापूरकर, प्रताप कालकुंद्रीकर व नितीन पाटील यांच्यात लढत झाली. त्यामध्ये अविघ्नच्या विकास शहापूरकरने पिळदार शरीराच्या जोरावर श्री गणेश हा किताब पटकाविला. मोरया जिमच्या रोहित भट्टने उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला.
स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते सुहास शिरोडकर, शरद पै, बसवराज विभूते, राजु मोरे, सार्थक मोरे, गणेश गुंडप, प्रताप सिद्दण्णावर, मोतिचंद दोरकाडी, अजित सिद्दण्णावर, शुभम कलघटगी, विजय चौगुले, विजय जाधव, निवृत्त कॅप्टन प्रकाश नागरदळेकर, राजू गाडवी, अमित किल्लेकर, राजू हिंडलगेकर, प्रवीण हिंडलगेकर, स्वाती गेंजी, सोनाली बिर्जे आदि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विकास शहापूरकर याला मानाचा किताब, आकर्षक फिरता चषक, कायमस्वरूपी चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले तर रोहित भट्टला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी जे. डी. भट्ट, जे. निलकंठ, शरिफ मुल्ला, एम. के. गुरव, एम. गंगाधर व उमा महेश, सुनील राऊत, हेमंत हावळ, बसवराज अरळीमट्टी, सुनील पवार, मेहबूब, सचिन मोहिते, प्रशांत सुगंधी, मि. इंडिया सुनील आपटेकर व अजित सिद्दण्णावर यांनी पंच म्हणून काम पाहिले.









