Vikas Naik, owner of Mauli Printing Press, Byculla, passed away
मुंबई भायखळा येथील माऊली प्रिंटिंग प्रेस चे मालक विकास रामा नाईक 62 यांचे मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी तीन भाऊ असा परिवार आहे ते डेगवे जांभळवाडी येथील रहिवासी असून नोकरीनिमित्त मुंबईला गेले नोकरी सोडून त्यांनी भागीदारीत प्रिंटिंग व्यवसाय सुरू केला त्यानंतर त्याने स्वतः माऊली प्रिंटिंग प्रेस भायखळा येथे सुरू केली. ते डेगवे हितवर्धक संघ मुंबईचे सह खजिनदार होते .गावच्या विकासाबाबत त्यांना तळमळ होती. दानशूर व्यक्तिमत्व होते .त्यांच्या निधनाने डेगवे हितवर्धक संघाचे मोठे नुकसान झाले. चांगल्या सहकाऱ्याला आपण मुकलो असल्याच्या शब्दात डेगवे हितवर्धक संघाचे अध्यक्ष माजी आमदार गुरुनाथ देसाई कार्यवाह उल्हास देसाई यानी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सावंतवाडी / प्रतिनिधी









