“सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा”, असं विधान शिवानी वडेट्टीवार यांनी एका सभेत बोलताना केलं होतं.त्यावरून राजकीय वर्तुळात आता दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. यासंदर्भात वाद निर्माण झालेला असताना शिवानी यांचे वडील विजय वडेट्टीवार यांनी याबाबत एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, या संदर्भात मी शिवानीशी बोललो आहे. तिने सावरकरांनी लिहिलेलं ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातला संदर्भ घेतल्य़ाचे सांगितले आहे. शिवानी वकिल आहे, तिला वाचनाचा छंद आहे. तीने पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे त्यामुळे वाद करण्याचे काही काम नाही. याबाबत शिवानी सविस्तर बोलेल अंस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाली शिवानी वडेट्टीवार
शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केलं आहे. “हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाही. ते सावरकर मोर्चा काढतात. मला आणि माझ्यासह इतर भगिनी महिलांना भीती वाटत असेल. सावरकर म्हणायचे बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. ते तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे. मग माझ्यासारख्या महिला-भगिनींना सुरक्षित कसं वाटेल? अशा लोकांच्या प्रचारासाठी हे लोक मोर्चा काढतात”, असं शिवानी वडेट्टीवार बोलताना या व्हिडीओत दिसत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








