ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधानसभेचा विरोधीपक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार यांचे नाव काँग्रेस हायकमांडकडून निश्चित करण्यात आले आहे. चार वर्षानंतर काँग्रेसकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद चालून आले आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मविआमध्ये संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने या पदावर दावा केला होता. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन नेत्यांची नावे या पदासाठी चर्चेत होती. आज काँग्रेस हायकमांडकडून विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे.








