सावंतवाडी : प्रतिनिधी
मूळ वेंगुर्ले येथील आणि सध्या सावंतवाडी सबनीसवाडा येथे स्थायिक विजय कमलाकांत सापळे (८०) यांचे गुरुवारी दुपारी ३.३० वाजता राहत्या घरी अल्प आजाराने निधन झाले. व्यवसायानिमित्त गेली ४० वर्षे त्यांचे सावंतवाडी येथे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पुतण्या, सून, ४ विवाहित पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मारुती, अशोक, सुहास व प्रदीप पोकळे आणि रेखा पोकळे यांचे ते भावोजी तर बाळ बोर्डेकर यांचे ते मावस बंधू होत. बांबोळी गोवा येथे विजय सापळे यांचे देहदान करण्यात आले. त्याप्रसंगी पत्नी रेखा, पुतणी डॉ. योजना मोरजकर-सापळे व नातेवाईक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









