Vijay Naik passed away
वेतोरे-पालकरवाडी (कराडेवाडी ) येथील रहिव्रोसी, वेंगुर्ले हायस्कूलचे सेव्रोनिवृत्त कलाशिक्षक, पालकरवाडी ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच महादेव मदन उर्फ विजय नाईक (85) यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
विजय नाईक यांनी वेतोरे सातेरी सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष, वेतोरे शिक्षण प्रसारक समितीचे कार्यकारिणी सदस्य म्हणून उत्तमरीत्या काम पाहिले. पालकरवाडी ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यानंतर ते गावाचे प्रथमच सरपंच झाले. त्यांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत ग्रा. पं. इमारत, गावात नळया॓जना, रास्त दराचे धाान्य दुकान आदी कामे त्यांनी केली. ग्रामस्वच्छता अभियानात गाव्रोला 40 हजाराचे बक्षीसही त्यावेळी मिळाले.
वेंगुर्ले प्रतिनिधी









