वार्ताहर,कास
Satara News : परळी खोऱ्यातील वारसवाडीचा जवान विजय रामचंद्र कोकरे (वय- २७) याचे श्रीनगर येथे देशसेवा बजावत असताना हदयविकाराच्या तिव्र झटक्याने गुरुवारी दुर्देवी दुखद निधन झाले. त्याच्या पार्थिवावर मुंबई येथील विक्रोळी स्मशानभूमीत हाजारो जनसमुदायाच्या उपस्थीत सैन्यदलाकडून तिन तिन फैरी झाडुन मानवदंना देत, अंतिम अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी विजय कोकरे अमर रहे अमर रहे च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
महिनाभराची रजा संपल्यानंतर रविवारी मुंबईतुन श्रीनगरकडे देशसेवा बजावण्यासाठी गेलेल्या विजय कोकरे याच्या छातीत गुरुवारी सकाळी कामावर असताना अचानक दुखू लागले. अस्वस्थ वाटु लागल्याने त्याला उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा पुर्वीच त्याची ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने प्राणज्योत मालवली. हि माहीती त्यांचे मुळ गाव असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या परळी खोऱ्यातील सांडवली वारसवाडी गावात पोहचताच परळी खोऱ्यावर दुखःचा डोंगर कोसळला. अनं परळी खोऱ्यातला एक जवान शहीद झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली. त्याचे पार्थिव शुक्रवारी मध्यरात्री जम्मु कश्मीर श्रीनगर येथुन मुंबईतील सांतक्रुझ विमानतळावर आणण्यात आले.
शनिवारी सकाळी साठे आठ वाजाता मुंबईतील कांर्जुमार्ग पवई येथील आय. आय. टी मार्केट, इंदीरा नगर मधील त्याच्या राहत्या घरा जवळ पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी आई-वडील बहीण अन् नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दर्शनासाठी परळी खोऱ्यासह सातारा जिल्ह्यातील गावावरून गेलेले व मुंबईस्थीत रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पवई परिसरातील रहीवाशांसह संत निरंकारी सत्संग समुहाचे महात्मा मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी अंत्यसंस्कार रॅली व नियोजनामध्ये योग्य नियोजन करून सहभाग घेतला.
पवईच्या आय.आय. टी मार्केट पासुन हाजारो जनसामुदाच्या उपस्थीतीत दोन तास पायी चालत निघालेली अंत्ययात्रा विजय कोकरे ‘अमर रहे अमर रहे’ च्या घोषणांनी विक्रोळी येथील टागोर नगर स्मशानभुमीत पोहचली स्माशनभुमीत सैन्यदल व पोलीस दलाकडून तिन तिन फैरी झाडुन चुलत भाऊ राकेश व विघ्नेश यांच्या हस्ते मुघाग्नी देऊन शासकीय नियमात अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्यदलातील वरीष्ठ अधिकारी यांच्यासह जवान मुंबई पोलीस विक्रोळीचे आमदार सुनिल राऊत ,स्थानिक नगरसेवक,सातारा जिल्हा शिवसेना नेते एकनाथ ओंबळे,सहयाद्री धनगर विकास महासंघाचे माजी अध्यक्ष बाबुराव कोकरे, इंदीरा नगर मधील विविध पक्षाचे पदाधिकारी, आदी मान्यवरांसह जन सामुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.