-काळ्या दिनाच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बेळगावला जात असताना पोलिसांनी अडवले.
कागल / प्रतिनिधी
एक नोव्हेंबर रोजी सीमा भागातील मराठी बांधवांकडून काळा दिन पाळला जातो. यामध्ये सामील होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे मंगळवारी पुन्हा बेळगावकडे जात होते. कोगनोळी जवळ त्यांना आज पुन्हा कर्नाटक पोलिसांनी अडवले. कर्नाटकात जाण्यास मज्जाव केला.
यावेळी बोलताना विजय देवणे म्हणाले, कर्नाटक शासनाने पुन्हा दडपशाहीचे धोरण अवलंबले आहे. काल आम्ही शिवसेनेच्या वतीने मशाल घेऊन बेळगावकडे जाणार होतो. यावेळी आम्हाला रोखण्यात आले. मात्र आजही काळ्या दिनाच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी जात असताना पुन्हा अडवले. मात्र आम्ही कागल -गडहिंग्लज व चंदगड मार्गे आम्ही बेळगावला जाणारच आहोत.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- Ichalkaranji Crime : शहापूरमध्ये आर्थिक कारणातून तरुणाचा निर्घृण खून
दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. गेली दोन दिवस कर्नाटक पोलीस बेळगावकडे जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करत होते.