खेड :
दिल्ली येथे झालेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन सबज्युनिअर चॅम्पियनशीप कराटे स्पर्धेत विहान दर्शन विचारे याने सुवर्णपदक प्राप्त करत कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत देशभरातील ३० राज्यांतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सर्वोत्तम कार्मागरी करत त्याने सुवर्णपदकाला
गवसणी घातली. या गौरवशाली कामगिरीबद्दल त्याचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. खेड लायन्स क्लब ऑफ सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्याहस्ते त्याचा सत्कार करून कौतुक करण्यात आले आहे.








