कसबा बीड प्रतिनिधी
17 ऑक्टोबर पासून शिरोळ मधून सुरू झालेल्या जन आक्रोश पदयात्रा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाली आहे. ही पदयात्रा सोमवार दि.23/10/23 सकाळी 7 वा घानवडे ते कोगे मार्गे कुंभी कासारी साखर कारखाना कुडित्रे जाणार आहे. यावेळी आझाद हिंद क्रांती संघटनेचे मा. मुकुंद पाटील व सर्व शेतकरी 22 कि.मी पायी प्रवासाचा शुभारंभ करणार आहेत. यानिमीत्त जनजागृतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व आझाद हिंद क्रांती संघटनेचे मा. मुकुंद पाटील कोपरा सभा प्रत्येक गावात घेऊन सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
घानवडे व महे येथे कोपरा सभा घेण्यात आली. या सभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा. बाजीराव देवाळकर व मा. बाजीराव पाटील यांनी मनोगते व्यक्त केले . मांडरे, चाफोडी, गर्जन, आरळे येथील शेतकर्याना दिवसभर भेटी दिल्या. यावेळी घानवडे येथे मा. सरपंच बळवंत पाटील, शिवाजी पाटील, संतराम देसाई, सुहास देसाई व इतर पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. तसेच महे येथे ही कोपरा सभा घेण्यात आली .या सभेस सरपंच मा. सज्जन पाटील, माजी उपसरपंच सचिन पाटील, जगदीश पाटील, दिपक कुंभार, रणधीर पाटील, चंदर पाटील तसेच सर्व शेतकरी उपस्थित होते.









