राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा : धीरज पहिला तर चरणराज दुसरा उपविजेता, मंजुनाथ कोल्हापूरे उत्कृष्ठ पोझर
बेळगाव : कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व म्हैसूर जिल्हा शरीरसौष्ठव संघटना, ऑक्सिजन फिटनेस तसेच सुपर नोवा फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वी मि. चामराज वडियर राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत उडपीच्या विघ्नेशने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. वडियर हा मानाचा किताब पटकाविला तर उडपीच्या धिरजला पहिले उपविजेतेपद तर चरणराजला दुसरे उपविजेत्यापदावरती समाधान मानावे लागले. तर बेळगावच्या मंजुनाथ कोल्हापूरेने उत्कृष्ठ पोझरचा बहुमान मिळविला. म्हैसूर येथे घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राज्यातून जवळपास 500 हून अधिक शरीरसौष्ठव पटूंनी भाग घेतला होता. निकाल पुढील प्रमाणे…
- 55 किलो वजनी गट-1)कृष्ण प्रसाद-उडपी, 2) संदेशकुमार-उडपी, 3)गोविंद यादव-गदक, 4) सलमान खान-शिमोगा, 5) संजय कुमार-बेळगाव.
- 60 किलो वजनी गट-1) शशिधर नाईक-उडपी, 2) गजानन गावडे-बेळगाव, 3) सतीश-म्हैसूर, 4) रोनॉर्ल्ड डिसोजा-कारवार, 5) शांतेश एम.-बेंगळूर.
- 65 किलो वजनी गट-1) धिरजकुमार-उडपी, 2) अभिलाश-उडपी, 3) व्यंकटेश ताशिलदार-बेळगाव, 4) आकाश आर.-शिमोगा, 5) सोमशेखर कारवी-उडपी.
- 70 किलो वजनी गट-1)विघ्नेश-उडपी, 2) संजयकुमार-बेंगळूर, 3) अझर पाशा-शिमोगा, 4) सुनील भातकांडे-बेळगाव, 5) रघुनंदन बी.-बेंगळूर.
- 75 किलो वजनी गट-1) प्रताप कालकुंद्रीकर-बेळगाव, 2) दिनेश आचार्य-कारवार, 3) लोकेश पाटील-शिमोगा, 4) श्रीनिधी ए. जे.-हासन, 5) धनंजया-बेंगळूर.
- 80 किलो वजनी गट-1) राहुल मेहरवाडे-दावणगेरी, 2) अल्तमश-कारवार, 3) पवन-उडपी, 4) सत्यानंद भट्ट-म्हैसूर, 5) राहुल कलाल-बेळगाव.
- 85 किलो वजनी गट-1) गिरीश मायगेरी-धारवाड, 2) व्ही. बी. करण-बेळगाव, 3) अनुजसिंग-मंगळूर, 4) ग्लेनडायस-उडपी, 5) मोहीद शोहेब रजाक-बेंगळूर.
- 85 किलो वजनी गवरील-1) चरणराज-उडपी, 2) किसन शेट्टी-कारवार, 3) मोहम्मद नोरुल्ला-चित्रदुर्गा, 4) अझर एस.-म्हैसूर, 5) गितेश-द.कन्नडा यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले.
मि. चामराज वडियर किताबासाठी कृष्णप्रसाद, शशिधर नाईक, धिरजकुमार, विघ्नेश, प्रताप कालकुंद्रीकर, राहुल मेहरवाडे, गिरीश मायगेरी व चरण राज यांच्यात लढत झाली. यामध्ये विघ्नेश, धिरज व चरणराज यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर विघ्नेशने मि. चामराज वडीयर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब पटकाविला. धिरज पहिले उपविजेतेपद तर चरण दुसरे उपविजेतेपद पटकाविले. बेळगावच्या मंजुनाथ कोल्हापूरेने उत्कृष्ठ पोझरचा बहुमान मिळविला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









