पणजी : इर्शाळगडच्या दुर्घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र इर्शाळगडची दुर्घटना होण्याआधी सतर्कतेबाबतचा इशारा आदल्या दिवशी देण्यात आला होता. आता गोवा राज्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी या जिह्यात दरड कोसळण्याचा इशारा दिला आहे. डोंगरावरून दरड कोसळणे, दगडमाती वाहून येणे, झाडे, भिंती पडणे, रस्ते खचणे, पाणी साचणे किंवा पूर येणे अशा घटना घडू शकत असल्याने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. गोव्यातील पेडणे येथेही दरड कोसळण्याची शक्मयता वर्तवली आहे. त्याचबरोबर मोठा पाऊस सुरू असताना घाट रस्त्यांवरून प्रवास टाळावा आणि धबधब्याच्या ठिकाणी थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Articleयवतेश्वर घाटात मृत्यू बनलेला महाकाय दगड हटवला
Next Article स्फोटके भरलेल्या टॅंकरच्या दूरध्वनीने उडाली खळबळ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









