चव्हाट गल्ली क्लस्टर प्राथमिक क्रीडा स्पर्धा : चव्हाट गल्ली क्लस्टर प्राथमिक विभागीय क्रीडा स्पर्धा : विजेते स्पर्धक शहर-तालुका स्पर्धेसाठी पात्र
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व केएचपीस क्र. 26 विजयनगर आयोजित प्राथमिक विभागीय चव्हाट गल्ली क्लस्टर क्रीडा स्पर्धेत योगा व बुद्धिबळ स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन सेंट जोसेफ, सेंट मेरीज व बी. के. मॉडेल स्कूलच्या खेळाडूंनी वर्चस्व मिळविले आहे. विजयनगर येथील केएचपीस 26 शाळेच्या सभागृहात बुद्धिबळ व योगा स्पर्धेचे उद्घाटन शहर गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, बीआरसी समन्वयक आय. डी. हिरेमठ, सीआरपी इंदिरा काळे, मुख्याध्यापक आर. एन. बेळगावकर, एस. एस. अरळीकट्टी, राजू कोलकार व नागराज भगवंतण्णवर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
योगा स्पर्धेत मुलांच्या गटात सोहम काळभैरव-सेंट मेरीज, प्रणय करोशी-एन. एस. पै, सिद्धांत पाटील-सेंट मेरीज, कार्तिक कामत-बी. के. मॉडेल, ज्योतिरादित्य पाटील व प्रेम चौगुले-दोघेही सेंट मेरीज, मुलींच्या गटात ध्रिती साकरे-सेंट मेरीज, रुही जाधव-सेंट जोसेफ, खुशी पावले-सेंट मेरीज, मुकुंदा मुरकुटे-सेंट जोसेफ, लक्ष्मी हिरेमठ-बी. के. मॉडेल, फरहीन मतेखान-यीजीएस नं. 1, श्रेया भंडारी-बी. के. मॉडेल यांनी विजेतेपद पटकावले.
बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात रावी कोटबागी, मनाली बार्ले-मराठी विद्यानिकेतन, ब्रह्मी सरफ-सेंट जोसेफ, मेघना कोप्पद-सेंट जोसेफ, साची पवार-मराठी विद्यानिकेतन, मुले : रितेश मुचंडीकर-मराठी विद्यानिकेतन, इशान देसाई व केवल देसाई-सेंट मेरीज, अजिंक्य देसाई व प्रेम पाटील-मराठी विद्यानिकेतन. 14 वर्षाखालील आठवीचे खेळाडू-अनुष्का पाटील व वैजनाथ पाटील-मराठी विद्यानिकेतन यांनी विजेतेपद पटकावले. बुद्धिबळ स्पर्धेसाठी मॅग्राट दत्ता पाटील, जुलिनी डिसोझा यांनी काम पाहिले तर योगा स्पर्धेसाठी सविता नायकर, प्रेम पाटील आदी मान्यवरांनी काम पाहिले. वरील विजेते स्पर्धक बेळगाव शहर व तालुका स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.









