पणजी : गेली 25 वर्षे , गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्रात विविध स्तरांवर योगदान देत आलेली आणि शिशुवाटिकेपासून उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत 72 शैक्षणिक संस्था चालविणाऱ्या, सरकारी मान्यताप्राप्त, विद्याभारती-गोवा या गोव्यातील प्रमुख शैक्षणिक संघटनेची राज्य व उत्तरदक्षिण जिल्हा कार्यकारिणीची घोषणा नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आली. विद्याभारतीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, व देशातील सर्व राज्यात विविध स्तरांवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा गाढा अनुभव असलेले ख्यातनाम शिक्षणतज्ञ प्रा. दिलिप बेतकेकर यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली पुढिलप्रमाणे राज्य कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अध्यक्ष-डॉ. सीताराम कोरगावकर, कार्याध्यक्ष-प्राचार्य गजानन मांद्रेकर, उपाध्यक्ष- प्राचार्य अनिल सामंत, संघटनमंत्री-पुऊषोत्तम कामत, सचिव-माधव केळकर, सहसचिव-प्रा. मनोहर पेडणेकर, कोषाध्यक्ष-सूर्यकांत गावस, सदस्य-प्राचार्य पांडुरंग नाडकर्णी, प्राचार्य ज्ञानेश्वर पेडणेकर, प्राचार्य सुभाष वेलिंगकर, प्रा. माधव जोशी पदसिद्ध सदस्य : प्राचार्य उदय बाळ्ळीकर(अध्यक्ष-दक्षिण गोवा), – डॉ. राजेश पेडणेकर (उत्तर गोवा अध्यक्ष), डॉ. रोशन सामंत (राज्य शिशुवाटिका प्रमुख).
दोन्ही जिह्यांच्या कार्यकारिणी पुढिलप्रमाणे
उत्तर गोवा कार्यकारिणी- अध्यक्ष-डॉ. राजेश पेडणेकर, उपाध्यक्ष-प्राचार्य सुभाष नायक, उदय कुडाळकर, सचिव-प्रा. सुभाष पळ, सहसचिव-मुकुंद कवठणकर, कोषाध्यक्ष-संजय शिरगावकर, सदस्य-दामोदर नाईक, शशिकांत नाईक(सांखळी), डॉ. प्रा. अऊण मराठे, हनुमंत मांजरेकर, आनंद फडते, आनंद मयेकर, गणपतराव राणे, अनंतराव राणे, उदय सामंत, शशिकांत नाईक( म्हापसा).
दक्षिण गोवा कार्यकारिणी : अध्यक्ष-प्राचार्य उदय बाळ्ळीकर, उपाध्यक्ष-रंजन नाईक, शिवानंद देसाई, सचिव-प्रा. आनंद देसाई, सहसचिव-नरहरी नाईक, कोषाध्यक्ष-मेधा प्रभुदेसाई, सदस्य-शुभदा आचार्य शिरोडकर, प्रा. तनुजा फळदेसाई हीना प्रभुदेसाई, दिलखुष शेट, गजानन हरमलकर, पांडुरंग कोरगावकर, मोहन चंदगडकर, वासुदेव खंवटे, ज्योती बांदोडकर. तालुकास्तरावरील कार्यकारी समित्या एप्रिल अखेर जाहीर करण्यात येतील, असे विद्याभारती गोवाचे अध्यक्ष डॉ. सीताराम कोरगावकर यांनी सांगितले.









