कोल्हापूर / रूपाली चव्हाण :
विद्येचे माहेर असलेल्या शिवाजी विद्यापिठ ते माऊली चौक हा मार्ग अतिक्रमण व बेशिस्त वाहतुकीमुळे सायबर चौक हा अपघात चौक म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सायबर चौक परिसरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, बेकरी, कोचिंग क्लासेस तसेच राजारामपुरी पोलीस स्टेशन आदीमुळे हा परिसर वाहतुकीने गजबजून गेलेला आहे. सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत या मार्गावर नागरिकांना वाहनासह पायी चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
माऊली चौक, सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ मार्गावर शाळा, महविद्यालयांसह कोचिंग क्लासेस, पोस्ट ऑफिस, शैक्षणिक क्लासेस आहेत़ जुना पुणे–बेंगलोर रोडवरून सायबर चौकामधून रिंगरोडवरून कोकणाकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची मोठी गर्दी असते. या वेळेतच रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने दुतर्फा उभारलेली असतात. त्यामुळे पादचाऱ्याना ये–जा करण्यासाठी मोजकाच फुटपाथ ]िशल्लक राहो. त्याचबरोबर दुकानासमोर लावलेले बोर्ड, दिशादर्शक फलक, फेरीवाल्यांच्या गर्दीने हा चौक मृत्यूचा सापळा ठरत आहे. कांही महिन्यांपूर्वी एक मोठा अपघात झाल्dयाने, दोघांना जीव गमवावा लागला होता. रोज या मार्गावर छोंटे–मोठे अपघात होत़ असल्याचे चित्र आहेत.
- विजय बेकरी चौकातही कोंडी
विजय बेकरेकडून शिवाजी विद्यापीठाकडे जाताना कोपऱ्यावर डाव्या बाजूस केएमटी बस स्टॉप आहे. त्यामुळे अचानक बस थांबत असल्याने अपघात होत आहेत. तर पादचाऱ्यांनाही तेथून जाता येत नाह़ी याकडे वाहतूक पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ असून, या फूटपाथवर व्यावसायिकाचे मोठे अतिक्रमण, आहे. तसेच बंद गाड्या तसेच कचऱ्याचे ढीग आहेत. यामुळे पादचारी व वाहनधारकाची हा रस्ता डोकेदुखी बनलेला आह़े वाहत़ुकीचा अडथळा दूर व्हावा, अशी मागणी येथील नागरिकासह वाहतूकधारकांमधून होत आहे. सायबरपासून ते मंडलिक पार्क म़ार्गावरील रस्त्याची अवस्था फार खराब आह़े खड्डे असल्याने, लोकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बाधंकामासाठीचे साहित्य, खडी, वाळूचे रस्त्याकडेला ढीग असल्याने, मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लोकानां जीव मुठीत घेऊनच बाहेर पडावे लागत आहे.








