सस्पेंस अन् थ्रिलर धाटणीचा चित्रपट
अभिनेत्री विद्या बालन सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘नीयत’वरून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विद्या बालनचा मागील वर्षी ‘जलसा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, परंतु त्याला फारसे यश मिळाले नव्हते. तर विद्या आता ‘नीयत’द्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन करत आहे. ‘नीयत’ हा सस्पेन्स आणि थ्रिलरयुक्त चित्रपट असून तो 7 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

एका अब्जाधीशाच्या पार्टीत रहस्यमय हत्यांच्या तपासावर या चित्रपटाची कहाणी आधारित आहे. सर्व संशयित काहीतरी लपवत असल्याचे याच्या कहाणीत दर्शविण्यात येणार आहे. विद्या बालनसोबत या चित्रपटात शशांक अरोडा, नीरज काबी, राम कपूर, मीता वशिष्ठ, अमृता पुरी आणि प्राजक्ता कोळी हे कलाकार दिसून येणार आहेत. अभिनेत्रीने यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले होते, ज्यात ती क्लॅपबोर्डसह दिसून आली होती.
स्वत:च्या पसंतीच्या लोकांपैकी काहींसोबत अलिकडच्या काळात वाचलेल्या सर्वात आकर्षक पटकथांपैकी एकाचे शूटिंग सुरू करण्यासाठी उत्सुक असल्याचे तिने म्हटले होते. प्राइम व्हिडिओ अन् निर्माण कंपनीसोबत काम करता आल्याने आनंदी असल्याचे तिने नमूद केले होते.









