चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
अभिनेत्री विद्या बालनने आतापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. डर्टी पिक्चर आणि कहानी यासारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. विद्या बालन आता ‘नीयत’द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

अनू मेननकडून दिग्दर्शित हा चित्रपट रहस्यपट आहे. विद्या बालन या चित्रपटात हेर मीरा रावची भूमिका साकारत आहे. एका हत्येचे गूढ उकलताना ती दिसून येणार आहे. अभिनेत्रीने अलिकडेच या चित्रपटाचा टीझर जारी केला होता. तर आता याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कहाणी मर्डर मिस्ट्रीच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. या चित्रपटातील विद्याचा फर्स्ट लुक देखील समोर आला आहे. नीयत चित्रपटाच्या ट्रेलरला मोठी पसंती मिळत आहे. तर नीयत हा चित्रपट नाइव्स आउट या इंग्रजी चित्रपटाचा रिमेक असल्याचा कयास काही जणांकडून वर्तविण्यात येत आहे.
नीयत या चित्रपटाचे चित्रिकरण ब्रिटनमध्ये झाले आहे. या चित्रपटात विद्या बालनसोबत राम कपूर आणि राहुल बोस यांचा अभिनय पाहता येणार आहे. हा चित्रपट 7 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे विद्या बालन ही 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे.









