Vidhan Parishad Election:राज्यात राज्यसभेच्या (Rajyasabha Election) निवडणुकीने वातावरण तापलं असताना आता विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) दहा जागांसाठी मतदान होणार असल्याची घोषणा काल निवडणूक आयोगाने (Election Commission)केली. यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे. एकीकडे रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रवीण दरेकर, (Pravin Darekar) सदाभाऊ खोत अशा दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपल्याने त्य़ा जागी त्यांनाच संधी मिळणार का? त्याठिकाणी नविन चेहरे मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय या उमेदवारीवरून सर्वच पक्षात पक्षाअंर्तगत चढाओढ पहायला मिळेल. तर राज्यसभेचीही निवडणूक राज्याच चर्चेचा विषय बनला आहे. ३ जूनपर्यत अर्ज माघारीचा कालावधी असून, अनेकांची राजकीय समिकरणं जुळू शकतात. त्य़ामुळे ३ जून रोजी यात कोणाची दांडी उडणार हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.
तर दुसरीकडे आज राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि कोल्हापुरचे कट्टर शिवसैनिक जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. यानंतर छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच विधान परिषदेसाठी भाजपच्या चार जागा संख्याबळानुसार निवडून येऊ शकतात, असा अंदाजही बांधला जात आहे.
विधानपरिषदेत कोणाला संधी मिळणार? ‘हे नेते देखील इच्छुक
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा कार्यकाल जरी संपुष्टात आला असला तरी त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय रामराजे नाईक-निंबळकर यांना राष्ट्रवादी पुन्हा संधी देणार काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटवरून चर्चेत असणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ,माजी मंत्री पंकजा मुंडे, अनिल बोंडे, राम शिंदे, कृपा शंकर सिंग यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपच्या ५ जणांचा कार्यकाळ संपणार आहे. मात्र यावेळी चार जागेसाठी कुणाला संधी मिळणार हे वरिष्ठांकडून अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सदाभाऊ खोत यांना मिळणार का संधी?
सदाभाऊ खोत (SadaBhau Khot) हे आपल्या रांगड्या स्वभावासाठी आणि भाषणाच्या हटके स्टाइलसाठी ओळखले जातात. भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनाही पुन्हा संधी शक्यता नाकारता येत नाही.
संभाजीराजे उद्या भूमिका जाहिर करणार
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने शिवबंधनाची अट घालत संभाजीराजेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संभाजीराजेंना मागचा अनुभव गाठीशी असल्याने अपक्ष लढणार, पाठिंबा द्या या मतावर ठाम राहत त्यांनी शिवबंधन नाकारले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णयानंतर आपली भुमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. शरद पवार यांनी आधी पाठिंबा जाहीर केला मात्र संपूर्ण चेंडू मुख्यमंत्र्याच्या कोर्टात टाकला. राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी उमेदवारी देतो पण शिवबंधनाची अट मुख्यमंत्र्यांनी घातली. संभाजीराजेंनी निर्णय दिला नाही म्हणून शिवसेनेने आज कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या उपस्थित भरला. यानंतर संभाजीराजे आता कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Previous Articleपहिल्या पावसात भिजतायं ! जरा थांबा, हे वाचा
Next Article शाहू चषक : मैदानातच खेळाडूंचा राडा








