मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणूकीत संख्याबळाच्या आधारे निकाल मविआच्या बाजूने लागेल. आमचा कोटा ठरवून आम्ही समीकरण योग्य जुळवलं आहे. मतांच्या समीकरणाचा फायदा मविआच्या सहाव्या उमेदवाराला होणार असे मतं काॅंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलेलं आहे. काॅंग्रेसच्या आमदारांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फोडाफोडीचं राजकारण यशस्वी होणार नाही. मविआच्या काही उमेदवारांची विजय निश्चित आहे. काॅंग्रेसच्या (Congress) आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. संख्याबळाच्या आधारे निकाल मविआच्या बाजूने लागेल असेही ते म्हणाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचं दिसून येत आहे. भाजपाने आपली ताकद पणाला लावली आहे. तर मविआने देखील आपले समीकरण योग्य जुळवलं आहे.
Previous Articleविधानपरिषदेबाबत ‘मनसे’चा सस्पेन्स; मतदानाबाबत काय म्हणाले आमदार
Next Article मुलायम केसांसाठी कंडिशनर लावण्याची योग्य पद्दत








