मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणूकीत आम्हाला गृहीत धरु नका असे मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. पाटील हे काही वेळापूर्वी विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.राजू पाटील यांनी विधानपरिषदेबाबत सस्पेन्स निर्माण केला आहे. (Vidhan Parishad Election 2022 live MNS mla Raju Patil)
राजू पाटील म्हणाले, तुम्ही मागील निवडणुकीतही पाहिलं असेल एका मताची किंमत किंवा त्याला किती महत्व असते. त्यामुळे मी राज साहेबांना रात्रीच भेटायला गेलो होतो. त्यांनी मला काही निर्देश दिलेले आहेत, त्या निर्देशानुसार मतदान होईल. आम्ही भाजपला मतदान करणार आहोत किंवा दुसऱ्या पक्षाला मतदान करणार, हे कोणी गृहीत धरू नये अशी माहिती राजू पाटील यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









