वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्लेचा सुपुत्र आणि वेंगुर्ला हायस्कूलचा विद्यार्थी विधान विठ्ठल धुरी याची सन 2025 -26 साठी राज्य क्रिडा प्रबोधनी बालेवाडी पुणे येथे निवड झाली आहे. वेंगुर्ला शाळेचा इयत्ता नववीचा विद्यार्थी विधान विठ्ठल धुरी (14) याने गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शन खाली वेंगुर्ला नगर परिषदेच्या सिंधुसागर तलाव येथे जलतरणचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम प्रकारे आपली कामगिरी इचलकरंजी, कोल्हापूर, पुणे याठिकाणी केलेली होती.आता त्याची पुढील जलतरण सराव करिता पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनी येथे निवड झाल्याने वेंगुर्ला तसेच सिंधुदुर्ग वासियांमार्फत कौतुक केले जात आहे.या संपूर्ण प्रवासात त्याच्या प्रशिक्षक, वेंगुर्ला नगर परिषद, आई, वडील यांचे महत्वाचे योगदान आहे. त्याचे आई वडील दोन्ही सुध्दा सिंधुदुर्ग पोलीस सेवेत कार्यरत आहेत. विशेष करून त्याच्या आईचे (दीपा विठ्ठल धुरी) योगदान आता पर्यंतच्या प्रवासात खूपच आहे. पोलीस दलातील आपल्या धकाधकीच्या कामातून सुद्धा आपल्या मुलाच्या क्रिडा गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी केलेली धडपड सुद्धा तेवढीच प्रशंसनीय आहे.









