मुंबई \ ऑनलाईन टीम
कोण म्हणतं या जगात देव नाही. वांगणी रेल्वे स्थानकावरील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हीडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एखाद्या चित्रपटातील दृष्य असल्यासारखी प्रत्यक्ष घटना अनेकांच्या काळजाचा रकाप उडवणारी अशीच आहे. येथे एक चिमुकला आईच्या हातातून सुटून थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि समोरुन भरधाव वेगाने गाडी येत होती. ही आई जीवाच्या आकांताने मुलाला वाचवण्यासाठी ओरडत होती. देवासारखा धावून आलेल्या पॉईंटमननं आपल्या जीवाची परवा न करता या चिमुकल्याचा जीव वाचवला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक सेंकदाचाही वेळ झाला असता तर चिमुल्यासह पॉईंटमनलाही जीव गमवावा लागला असता. मात्र जीव धोक्यात घालून पाईंटमन रेल्वे रुळावर धावत आला आणि चिमुकल्याला जीवदान मिळालं. पॉईंटमन मयूर शेळकेच्या प्रसंगावधानामुळे चिमुकल्याचा जीव वाचला. देवाच्या रूपात मयुरच धावला त्यामुले या चिमुकल्याचा प्राण वाचला.
नेमका प्रसंग काय आहे काय?
एक आंधळी माऊली १७ एप्रिलला सायंकाळी पाच वाजण्याचया सुमारास आपल्या चिमुकल्याला घेवून प्लॅटफॉर्मवरुन जात होती. तेवढ्यात तो चिमुकला आईच्या हातातून सुटून रेल्वे ट्रॅकवर पडला. त्या माऊलीला हे कळालं की आपला मुलगा ट्रॅकवर पडलाय, पण काहीही दिसत नसल्याने तिला कळेना काय करावं, तेवढ्यात तिला ट्रेनचा आवाज आला. तेव्हा ही आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आरडाओरड करु लागली. याचवेळी विरुद्ध बाजुच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या वागंणी स्टेशनवरील पॉईंटमन मयुर शेळके यांनी सर्व प्रकार पाहिला आणि प्रसंगावधान राकत त्याने थेट ट्रॅकवर उडी घेतली. त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या चिमुकल्याचे प्राण वाचविले. ह्रदयाचा ठोका चुकवणारी ही घटना आहे. खरं तर मयुर शेळेके या पॉईंटमनच्या धाडसामुळे या चिमुकल्यास जीवदान मिळालं. मयुरच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. शेवटी हा थरार पहिल्यानंतर ..’देव तारी त्याला कोण मारी’… याच म्हणीचा प्रत्यय येतो. मयुरच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Previous Articleसातारा : बाधित वाढीचा वेग थोडासा मंदावला
Next Article भारतीय विमानांना हॉंगकॉंगमध्ये नो एन्ट्री








