► वृत्तसंस्था/ मोहाली
अर्जेंटिनाचा जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू नॉरबर्टो एझेक्वील व्हिडाल बरोबर इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या पंजाब एफसी संघाने नुकताच नवा करार केला आहे.
2024-25 च्या इंडियन सुपरलीग क्लब फुटबॉल हंगामासाठी पंजाबएफसीने हा नवा करार 29 वर्षीय व्हिडालबरोबर केला आहे. त्याने इंडोनेशीयातील टेनजिरेंग क्लबकडून फुटबॉलच्या दोन हंगामात 60 सामन्यातून 17 गोल नोंदविले आहेत.









