झेवियर गॅलरी चषक 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा

बेळगाव : यूनियन जिमखाना आयोजित ताहिर सराफ पुरस्कृत झेवियर गॅलरी चषक 12 वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी युनियन जिमखाना संघाने निना संघाचा 137 धावांनी तर निना स्पोर्ट्सने टिळकवाडी क्रिकेट अकादमीचा 10 गड्यांनी पराभव करून विजयी सलामी दिली. महम्मद अब्बास, आर्यन बळगाळे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. यूनियन जिमखाना मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी युनियन जिमखानाचे उपाध्यक्ष संजय पोतदार, पुरस्कर्ते ताहिर सराफ, संजय मोरे, मिलींद चव्हाण, महांतेश देसाई, चंदन कुंदरनाड, प्रशांत लायंदर, समीर किल्लेदार व अनिल गवी आदी मान्यवर उपस्थित होते. यष्टीचे पूजन संजय पोतदार यांनी करून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी म्हणाले, पूर्वी लहान क्रिकेटपटूंना क्रिकेटपासून वंचित रहावे लागत होते. कारण त्यावेळी क्रिकेट स्पर्धा भरविल्या जात नव्हत्या. पण बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष व धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे समन्वयक अविनाश पोतदार यांनी होतकरू क्रिकेटपटूंना सर्व संधी मैदानी व स्पर्धाही भरविल्या गेल्याने आज बेळगावचे क्रिकेटपटू कर्नाटक राज्याच्या संघात बेळगावचे नाव करीत आहेत. त्यांनी बेळगाव येथे केएससीएच्या माध्यमातून बेळगावला सुसज्ज क्रिकेट स्टेडियम उभे केले आहे. त्यामुळे बेळगावकरांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे सामने व खेळाडू बेळगावकरांना पाहावयास व खेळाचा आनंद लुटता येत आहे. याचे सर्व श्रेय अविनाश पोतदार यांना जाते. त्यांनी चालू केलेले कार्य आपण जिमखानाच्या माध्यमातून सतत चालू ठेऊ, असे सांगून शुभेच्छा दिल्या. पहिल्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 164 धावा केल्या. त्यात महम्मद अब्बासने 41, प्रणव जेयने 37, फराहन शेखने 29, श्रेयस पाटीलने 26 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना निना संघाचा डाव 9.5 षटकात केवळ 27 धावात आटोपला. आर. एन. बोरगाळेने 11 धावा केल्या. जिमखानातर्फे महम्मद अब्बसने 5 तर महम्मद हमाजाने हॅट्ट्रीकसह 3 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात टिळकवाडी क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 100 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना निना स्पोर्ट्सने 8.5 षटकात बिनबाद 101 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात आर्यन बरगाळेने नाबाद 58 धावा केल्या









