वृत्तसंस्था/ दुबई
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्रे रुबलेवने एकेरीत विजयी सलामी देताना फिलिप क्रेजीनोव्हिकचा पराभव केला.
द्वितीय मानांकित रुबलेवने क्रेजीनोव्हिकचा 7-5, 6-2 तसेच अॅलेजेंड्रो फोकिनाने जेझारीचा सरळ सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेवने विजयी सलामी देताना झेकच्या लिहेकाचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला.









