सांगली प्रतिनिधी
अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने पाच जागा जिंकत विजयी सलामी दिली आहे. चेंबरच्या दोन्ही जागा सह हमाल व इतर दोन अशा आतापर्यंत मोजणी झालेल्या पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. विरोधी भाजपला आत्तापर्यंत एकही जागा मिळवता आलेली नाही. दुपारपर्यंत सर्व जागांचे निकाल हाती येतील असे सांगण्यात आले.








