आनंद चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : आनंद क्रिकेट अकॅडमी आयोजित आनंद चषक अंतर क्लब मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी आनंद क्रिकेट अकादमीने स्वामी विवेकानंद अकादमीचा तर एम्स क्रिकेट अकादमीने हुबळी क्रिकेट अकॅडमीचा पराभव करून विजय सलामी दिली. मरियम फय्याज व झोया काजी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावरती खेळवण्यात आलेल्या मुलींच्या अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत प्रसंगी रवी पाटील, रमेश पाटील, फिरोज शेख, धनराज रतन, आनंद करडी, मोरे यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सामन्यात हुबळी क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात तीन गडी बाद 159 धावा केल्या. त्यात वैष्णवी विकीने 36 तर तनिषा कामतने 27 धावा केल्या. एम्स तर्फे मरेमा फय्याज व माहीका फय्यास यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एम्स क्रिकेट अकॅडमीने 19.3 षटकात एक गडी बाद 160 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात माहीका फैयाजने 18 चौकारासह 94, प्राची धुरीने धावा केल्या. हुबळी स्पोर्टसतर्फे प्रिया चव्हाणने एक गडी बात केला. दुसऱ्या सामन्यात आनंद क्रिकेट अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात एक गडी बाद 219 धावा केल्या. त्यात झोया काजीने 17 चौकारांसह 90, तर प्रणाली आनंदने 7 चौकारांसह 57, मानसी मोरेने 13 धावा केल्या. स्वामी विवेकानंदर्फे समृद्धीने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्वामी विवेकानंद अकादमीने 22 षटकात 6 गडी बाद 186 धावाच केला. त्यात अनुश्रीने 21 चौकारांसह 113 धावा करून शतक झळकवले. तिला श्रेयाने 20 धावा करून सुरख सात दिली. अनंदतर्फे आरती कदम व स्वाती भट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.









