पदवीपूर्व महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने एसकेई सोसायटी संचलित जीएसएस कॉलेज आयोजित सुनिल चौगुले, दिपक जोगळेकर पुरस्कृत आंतर पदवी-पुर्व महाविद्यालयीन मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत सामन्यात जीएसएस, आरएलएस, लिंगराज, सेंट पॉल्स, गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, इस्लामिया संघानी आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत विजयी सलामी दिली. टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कृर्ते सुनील चौगुले, एसकेई सोसायटी क्रीडा विभागाचे चेअरमन आनंद सराफ, बीडीएफएचे अध्यक्ष पंढरी परब, अमित पाटील, रवी चौगुले, गोपाळ खांडे, जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद हलगेकर, रविंद्र पाटील, विनायक नाईक, एस. एस. नरगोडी, विजय रेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरुवारी झालेल्या विविध सामन्यात जीएसएस महाविद्यालय विजय विऊद्ध एक्सपर्ट महाविद्यालय 4-0 असा पराभव केला. या सामन्यात सुजल जी, सुमित, जीत, श्रेयश स्वामी यांनी प्रत्येकी 1 गोल केले. दुसऱ्या सामन्यात आरएलएस महाविद्यालयने भरतेश महाविद्यालय 4-0 असा पराभव केला. या सामन्यात आरएलएसतर्फे प्रथमेश, रेहान मुल्ला, ऋशिकेश, हुझिफा यांनी प्रत्येकी 1 गोल केले. लिंगराज महाविद्यालयने शहन महाविद्यालयचा 3-0, असा पराभव केला. लिंगराजतर्फे आयान किल्लेदार, जयदीप, अभिषेक यांनी प्रत्येकी 1 गोल केला. सेंटपॉल्स महाविद्यालयाने अंगडी महाविद्यालय 2-1 असा विजय प्राप्त केला. सेंट पॉल्सतर्फे नवालने 2 गोल केले. तर अंगडीतर्फे रुपेशने 1 गोल केला. गोगटे संघाने सीएमए पीयु कॉलेजचा 5-1 असा पराभव केला. गोगटेतर्फे साकीब जमादारने 2, अथर्व बी.ने 2 तर पृथ्वीराज के.ने 1 गोल केला. सीएमएतर्फे झहीद अहम्मदने 1 गोल केला.









